World Badminton Championships 2018

चीनमध्ये पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले आहे. सिंधूने सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधू अपयशी ठरली. तिने तो गेम तब्बल ११ गुणांच्या फरकाने गमावला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

World Badminton Championships –

ही स्पर्धा Badminton World Federation (BWF) या संस्थेमार्फत घेतली जाते.

पहिली जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा १९७७ साली आयोजीत करण्यात करण्यात आली होती.

१९८३ पर्यंत हि स्पर्धा प्रत्येक ३ वर्षातून एक वेळेस घेण्यात आली होती. परंतु त्यानंतर १९८५ पासून २००५ पर्यंत हि स्पर्धा दोन वर्षातून एकदा घेतली गेली.

बॅडमिंटन स्पर्धकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २००६ पासून याचे आयोजन दरवर्षी केले जात आहे.

स्पर्धेतील विजेत्याला मिळणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप हे “World Champions”ची ट्रॉफी व एक गोल्ड मेडल असे आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची रोख रक्कम देण्यात येत नाही.

२०१८ सालची जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा चीनमधील नानजिंग येथे पार पडली असून २०१९ साली या स्पर्धेचे आयोजन स्वित्झर्लंड मध्ये करण्यात येणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: