‘STAPCOR–2018’ परिषद

22-24 नोव्हेंबर 2018 या काळात लक्ष्यद्वीपच्या बंगाराम कोरल बेटावर ‘कोरल रीफची स्थिती आणि संरक्षणासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषद’ (STAPCOR–2018) भरविण्यात आली होती.

तसेच 2018 हे वर्ष ‘तिसरे डीकेडल इंटरनॅशनल इयर ऑफ रीफ्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

“रीफ फॉर लाइफ” या विषयाखाली या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून करण्यात आले होते. या परिषदेत विविध देशांमधून सुमारे 150 प्रतिनिधींचा सहभाग होता.


पार्श्र्वभूमी –

वश्विक तापमानवाढ, एलनिनो यामुळे 1998 साली जगभरात सागरी कोरल भाग मोठ्या प्रमाणात नष्ट झाला. त्यामुळे ‘कोरल रीफची स्थिती आणि संरक्षणासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषद’ (International Conference on Status and Protection of Coral Reefs -STAPCOR) याची स्थापना करण्यात आली.

जगभरातल्या कोरल रीफची स्थिती आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक 10 वर्षांनंतर ही आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात येते.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: