‘SAARC कृषी सहकार व्यवसाय मंच’

28 ऑगस्ट 2018 रोजी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये SAARC कृषी सहकार व्यवसाय मंचाच्या (SAARC Agri Cooperative Business Forum) पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवसांचा हा कार्यक्रम ‘ऑर्गनाइजींग अँड स्ट्रेन्थनिंग फॅमिली फार्मर्स कोऑपरेटिव्हज टू अटेन द सस्टेनेबल-डेव्हलपमेंट-गोल्स-1 अँड 2 इन साऊथ एशिया’ या विषयाखाली आयोजित केला गेला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना (UN FAO) आणि एशियन फार्मर्स असोसिएशन तसेच आंतरराष्ट्रीय कृषी विकास कोष (IFAD) यांच्यातर्फे संयुक्तपणे केले गेले आहे.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (SAARC) -

ही एक प्रादेशिक आंतरशासकीय संघटना आहे आणि दक्षिण आशियातल्या देशांची भौगोलिक संघटना आहे, ज्याची अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका ही सदस्य राज्ये असून याची 8 डिसेंबर 1985 रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली होती.

सार्क बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: