Re-Unite अॅप

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच ReUnite या मोबाईल अॅपचे अनावरण केले आहे. भारतातील हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

बेपत्ता झालेल्या मुलांचा मागोवा काढणारे हे पहिलेच अॅप आहे. आईवडिलांपासून काही कारणास्तव हरवलेल्या बालकांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहचवणे या अॅपद्वारे शक्य होणार आहे. या अॅप्लीकेशनमार्फत पालक आपल्या मुलांचे फोटो अपलोड करू शकतात, मुलाचे तपशील जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख इ. पोलिस स्टेशनला कळवू शकतात आणि हरवलेल्या मुलांची ओळख पटवू शकतात. हे  अॅप दोन्ही Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी संस्थापक असलेली स्वयंसेवी संस्था ‘बचपन बचाओ आंदोलन’ आणि कॅपजेमिनी या सॉफ्टवेअर कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.

मुलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘बचपन बचाओ आंदोलन’ या देशातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेने बालहक्क संरक्षणासाठी कायदे बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

2006 च्या निठारी प्रकरणामुळे बचपन बचाओ आंदोलन सुरू झाले होते.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: