RBI कडून 104 वित्त संस्थांची नोंदणी रद्द

रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्त पुरवठा (एनबीएफसी) श्रेणीतील 104 वित्त संस्थांची नोंदणी रद्द केली आहे.

बँकिंग व वित्त क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब जोमाने सुरू झाला आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेनेही ‘नो यूअर कस्टमर'(KVC) ची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना बँका व वित्त संस्थांना दिले आहेत.

त्याअंतर्गत वित्त साह्य घेणार्‍या प्रत्येक ग्राहकाची इत्यंभूत माहिती संस्थेकडे असावी, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. हे निर्देश न पाळणार्‍या संस्थांवर बँकेने कडक कारवाई सुरू केली आहे.

बँकेने 27 जुलै ते 3 ऑगस्ट या एका आठवड्यात देशभरातील 104 वित्त संस्थांचे व्यवहार करण्याचे अधिकार काढून घेतले. त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, हरयाणा, पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील वित्तिय संस्थांचा समावेश आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: