NASAची ‘केप्लर अंतराळ दुर्बिण’

अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन संस्थेची ‘केप्लर अंतराळ दुर्बिण’ नऊ वर्षांच्या सेवेनंतर इंधन संपल्यामुळे निवृत्त होत आहे.


केप्लर अंतराळ दुर्बीण -

* ही अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) याची अवकाशात पाठवलेली वेधशाळा आहे.

* सन 2009 मध्ये ‘केप्लर अंतराळ दुर्बीण’ अवकाशात सोडण्यात आली होती.

* सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासारख्या इतर ताऱ्यांभोवती फिरणारे पृथ्वीशी मिळतेजुळते परग्रह शोधणे हा या दुर्बिणीचा मुख्य हेतू आहे.

* या दुर्बिणीमध्ये पहिल्यांदा सन 2012 मध्ये बिघाड झाला होता. केप्लर दुर्बिणीने 2009 सालापासून आतापर्यंत जवळपास 1,50,000 ताऱ्यांचा वेध घेतलेला आहे.

* शास्त्रज्ञांनी केप्लरपासून प्राप्त माहितीच्या आधारावर आतापर्यंत 2,662 ग्रहांचा शोध लावलेला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: