Jio phone-2

Jio phone-2

रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओफोनसाठी एका धमाकेदार ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत कोणत्याही जुन्या फिचर फोनच्या बदल्यात नवा जिओफोन अवघ्या ५०१ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

जिओच्या जुन्या ग्राहकांचे फोनही नव्या Jio phone-2 च्या फिचर्ससह अपडेट होतील.

२० जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजून १ मिनिटांनी ही ऑफर सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचा जुना फिचर फोन घेऊन जिओचा नवा Jio phone-2 खरेदी करु शकतात.

बदलण्यासाठी आणलेला फोन कार्यरत असावा एवढीच अट आहे.

Jio phone-2 या फोनमध्ये व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि यु ट्यूबचाही सपोर्ट असणार आहे. मात्र, कंपनीने घोषणा केल्यानुसार १५ ऑगस्टनंतरच हे तिन्ही अॅप्स फोनवर कार्यरत होतील.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: