ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

52 व्या ISSF World Championship स्पर्धेत ज्युनिअर खेळाडूंच्या गटात भारताने 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

50 मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या अर्जुनसिंह चिमाने सुवर्णपदकाची कमाई केली, याचसोबत सांघिक प्रकारातही अर्जुनने आपले सहकारी गौरव राणा आणि अनमोल जैन यांच्यासोबत सुवर्णपदक पटकावले. गौरवने वैय्यक्तिक प्रकारातही कांस्यपदक आपल्या नावावर केले.

भारताच्या सिनीअर खेळाडूंना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. 2020 मध्ये टोकियात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी या स्पर्धेतून खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे.

10 मी. एअर रायफल मिश्र प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने पात्रता फेरीत सातवं स्थान पटकावले आहे. परंतु 0.4 गुणांच्या फरकाने भारतीय जोडीला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. याचसोबत दिपक कुमार-मेहुली घोष, हिना सिद्धु-शाहझार रिझवी, मनू भाकेर-अभिषेक वर्मा जोडीलाही अपयशाचा सामना करावा लागला.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: