ISRO मार्फत २ विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) रविवारी पीएसएलव्ही सी ४२ च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन झेपावले.

श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री १० वाजून ८ मिनिटांनी अंतराळात झेपावले.

या उपग्रह प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नव्हता.


विशेष माहिती –

या उपग्रहांचे एकत्रित वजन ८८९ कि.ग्रॅम आहे.

या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबतही माहिती घेणे शक्य होणार आहे. वनांचे मॅपिंग, पूर आणि नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवणे तसेच इतरही काही कामांसाठी यांचा उपयोग होईल.

हे उपग्रह पृथ्वीपासून ५८३ किमी उंचीवर सोडण्यात येणार आहेत.

‘सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज’ लिमिटेडने हे उपग्रह विकसित केले आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: