ISROचा जम्मू विद्यापीठासोबत सामंजस्य करार

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) जम्मूमधील केंद्रीय जम्मू विद्यापीठासोबत (Central University of Jammu -CUJ) एक सामंजस्य करार केला आहे.

जम्मू विद्यापीठात ‘सतीश धवन अंतराळ विज्ञान केंद्र’ (Satish Dhawan Center for Space Science) याची स्थापना करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये या प्रकारची ही पहिलीच संस्था असणार आहे.

याव्यतिरिक्त, इस्रोने विद्यापीठाच्या सेंट्रल सायंटिफिक इंस्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIR-CSIO) यांच्यासमवेत एक सामंजस्य करार केला आहे कि ज्याच्या माध्यमातून अंतराळ संशोधन, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वातावरणविषयक विज्ञान आणि संलग्न क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी युवा वर्गात जागृती निर्माण केली जाणार आहे.


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) –

ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक संस्था आहे. याचे  मुख्यालय बंगळुरू येथे आहे. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.

अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘इस्रो’ने  तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने, भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ही संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.


काही महत्वाचे प्रक्षेपण –

ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला.

1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.

22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.

‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: