“IOWave 18”

“IOWave 18 –

भारतासह हिंद महासागराचा किनारा लाभलेल्या अन्य 23 देशांनी 4-5 सप्टेंबर 2018 रोजी “IOWave 18 नावाने त्सुनामी बचाव मोहिमेचा सराव आयोजित केला आहे.

हा अभ्यास इराणच्या उत्तर-पश्चिम हिंद महासागरात आणि उत्तर सुमात्रा (इंडोनेशिया) याच्या पश्चिम किनाऱ्यालगत पूर्व हिंद महासागरात आयोजित करण्यात आला आहे.

“IOWave 18 हा UNESCOच्या आंतरसरकारी महासागर-शास्त्र आयोग (Intergovernmental Oceanographic Commission -IOC) द्वारा आयोजित केला गेलेला कार्यक्रम आहे.

26 डिसेंबर 2004 च्या त्सुनामीनंतर स्थापन करण्यात आलेल्या हिंद महासागर त्सुनामी चेतावणी व प्रतिबंध प्रणाली (IOTWMS)च्या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: