‘INS तारिणी’ जहाज भारतात परतले

भारतीय नौदलाचे ‘INS तारिणी’ हे जहाज जगभ्रमंती करून दिनांक 30 ऑक्टोबर 2018 रोजी भारतात दक्षिणी नौदल आदेशाखालील कोचीमधील तळावर परतले आहे.

दिनांक 10 एप्रिल 2018 रोजी सुरू झालेल्या या प्रवास मोहिमेला ‘लोकायन 18’ हे नाव दिले गेले होते.

INS तारिणीने आपल्या सात महिन्यांच्या प्रवासात 13 देशांमधील 15 बंदरांना भेटी दिल्या. जहाजाने फ्रान्समधील बोर्डेक्स येथे आयोजित ‘थ्री फेस्टिव्हल टॉल शिप्स रेगाटा’ आणि ‘टॉल शिप्स रेसेस युरोप 2018’ या कार्यक्रमातही भाग घेतला.


INS तारिणी –

* ‘INS तारिणी’ भारतीय नौदलाच्या दक्षिणी आदेशाखाली कोचीतल्या प्रथम प्रशिक्षण तुकडीचा एक भाग आहे.

* हे सन 2003-04 मध्ये जगभरात भ्रमण करणारे भारतीय नौदलाचे पहिले जहाज आहे.

* तीन शिडांचे हे जहाज 1997 साली भारतीय नौदलात सामील करण्यात आले.

* या जहाजाची बांधणी ब्रिटिश नौकाकार कॉलिन मुडी यांनी तयार केलेल्या संरचनेच्या आधारावर गोवामध्ये करण्यात आली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: