IDBI बँकेतील भागभांडवलाचे LIC कडून अधिग्रहण

भारतीय जीवन विमा मंडळाने IDBI बँकेच्या ५१ % भागभांडवलाचे अधिग्रहण करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

भारतीय जीवन विमा मंडळ - LIC

LIC ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून ती पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.

१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून निर्माण केलेल्या LIC चे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे.

मुंबईमध्ये LIC चे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत.

गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.

मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत.

युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: