ICICI बॅंकचे नवीन CEO

ICICI बँकेच्‍या CEO चंदा कोचर यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागेवर संदीप बक्‍शी यांची ICICI च्‍या सीईओ आणि एमडी पदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

पार्श्वभूमी –

ICICI बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला 2012 साली 3250 कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. बँकेच्‍या सीईओ चंदा कोचर यांनी हे कर्ज मंजूरही केले होते. मात्र 2016 साली ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे गुंतवणूकदार असलेले अरविंद गुप्‍ता यांनी एका पत्राद्वारे असा दावा केला होता की, चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हिडिओकॉन ग्रुपच्‍या मालकांशी व्‍यवसायिक संबंध आहेत. त्‍यामुळे ICICI बँकेने दिलेल्‍या या कर्जावर अनेक प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले. या प्रकरणाची चौकशी सध्‍या सुरू आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: