‘HIV व AIDS (प्रतिबंधक व नियंत्रण) अधिनियम-2017’

10 सप्टेंबरपासून संपूर्ण देशभरात ‘ह्यूमन इम्यूनोडिफीशियंसी व्हायरस (HIV) आणि अॅक्वायर्ड इम्यून डिफीशियंसी सिंड्रोम (AIDS) (प्रतिबंधक व नियंत्रण) अधिनियम-2017’ लागू करण्यात आला आहे. हा कायदा HIV/AIDS ने प्रभावित असलेल्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याकरिता तयार करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे.

 

हा कायदा रोजगाराच्या ठिकाणी तसेच उपचारामध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला दूर करतो. व्यक्तीला माहिती न देता HIVसंबंधी चाचणी, वैद्यकीय उपचार किंवा संशोधनाची परवानगी दिली जाणार नाही. यात केंद्रीय आणि राज्य सरकारची भूमिका, लोकपालाची भूमिका, पालकत्व याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या कारवाईमध्ये अश्या लोकांची ओळख उघडा न करण्यासंबंधी तरतूद देखील करण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: