Global Alliance to Eliminate Lymphatic Filariasis (GAELF)

लिम्फॅटिक फायलॅरिसिस या आजाराबद्दलच्या जनजागृतीसाठी आयोजित केलेली १० वी जागतिक परिषद दिल्ली येथे नुकतीच पार पडली आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी या परिषदेचे उदघाटन केले. Global Alliance to Eliminate Lymphatic Filariasis (GAELF) ही या वर्षीची भारत सरकारने आयोजित केलेली दुसरी बैठक होती. या अगोदर इ. स. २००२ मध्ये भारत सरकारकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कंबोडिया, इजिप्त, मालदीव, कुक बेटे, निए, मार्शल बेटे, श्रीलंका, थायलंड, टोंगा, टोगो आणि वानुआटु या ११ देशांना संबंधित आजाराच्या संक्रमणावर यशस्वीरीत्या नियंत्रण ठेवल्याबद्दल GAELF पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. Lymphatic Filariasis ला मराठीमध्ये हत्तीरोग या नावाने देखील ओळखले जाते.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: