‘FIFA फुटबॉल पुरस्कार 2018’

लंडनमध्ये झालेल्या वार्षिक ‘FIFA फुटबॉल पुरस्कार 2018’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे.

पुरस्कार विजेते –

वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू (महिला) – मार्टा (ब्राझील   आणि ऑरलांडो प्राइड) (सहावेळा हा सन्मान प्राप्त करण्याचा विक्रम)

सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू (पुरुष) – ल्यूका मोड्रिक (क्रोएशिया)

सर्वोकृष्ट प्रशिक्षक (पुरुष संघ) – दिदिएर देशॉ (फ्रान्सचे प्रशिक्षक)

सर्वोकृष्ट प्रशिक्षक (महिला संघ) – रेनाल्ड पेड्रोस (लायोन)

सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – थिबॉट कर्टोइस (बेल्जियम)

पुस्कास पुरस्कार – मोहम्मद सलाह (इजिप्त)

फेयर प्ले पुरस्कार – लिनार्ट थाय (जर्मनी)

फॅन पुरस्कार – पेरूचे प्रशंसक

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) :

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ हा एक खासगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो.

FIFA फुटबॉलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संघटनासाठी, विशेषत: विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून) यांसाठी जबाबदार आहे.

1904 साली FIFA याची स्थापना करण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे मुख्यालय झुरिच (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: