‘FIBA ​​3×3 वर्ल्ड टूर मास्टर्स’

भारत या वर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘FIBA 3×3 वर्ल्ड टूर मास्टर्स’ (हैदराबाद मास्टर्स) या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

हैदराबाद शहरात 22 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. यामध्ये भारताचे दिल्ली आणि बॅंगलोर हे दोन संघ भाग घेणार आहेत.

जगातील प्रथम क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय संघ ‘नोवी साद’ तसेच पिरान, बेलग्रेड हे संघ प्रामुख्याने याठिकणी सहभागी होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघांचा महासंघ (FIBA) -

18 जून 1932 रोजी स्थापना करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघांचा महासंघ (FIBA) याचे मुख्यालय मिएस (स्वित्झर्लंड) येथे आहे.

1960 सालापासून FIBA यांच्याद्वारा आयोजित केली जाणारी FIBA आशिया चषक स्पर्धा ही एक आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा आहे, जी आशियातल्या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांच्या दरम्यान दर दोन वर्षांनी खेळली जाते.

ही FIBA बास्केटबॉल विश्वचषक आणि ऑलंपिक बास्केटबॉल स्पर्धेसाठी आशियाई पात्रता स्पर्धा आहे

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: