Yojana :: Current Affairs

पहिले भारतीय पर्यटन व्यवसाय केंद्र

पर्यटन राज्यमंत्री, श्री. के. जे. अल्फोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार,फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टूरिझम अँड हॉस्पिटॅलिटी (FAITH) यांच्या सहयोगाने व राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या मदतीने पर्यटन मंत्रालयातर्फे 16 जुलै रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पहिले India  Tourism  Mart (ITM) आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दि. 18 सप्टेंबर 2018 पर्यंत असणार आहे.

हे पर्यटन व्यवसाय केंद्र पर्यटन क्षेत्रातील हितसंबंध जोपासणाऱ्या सर्व भागदारकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना

केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी आघाडीवर आहेत. फेब्रुवारी २०१८ पर्यंत अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत एकूण ७२ शिष्यवृत्ती जाहीर झाल्या आहेत. त्यातील ४० शिष्यवृत्ती या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या. या यादीत कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत.

राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजना –

सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजना चालवली जाते.

सुरुवातीला या योजनेतंर्गत ३० जागा होत्या. कालांतराने त्या वाढवून ६० झाल्या आणि २०१४ मध्ये या जागा १०० पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दर वर्षी अर्ज मागविण्यात येतात.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुला / मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, असे या योजनेचे नाव आहे.

अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) उच्च शिक्षण पूर्ण करणेसाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

error: