Sports :: Current Affairs

Youth Olympics स्पर्धेतील भारताचे पदक

अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या Youth Olympics स्पर्धेतील भारताला आज अॅथलेटिक्स क्रीडाप्रकारातील पहिले पदक मिळाले आहे.

सूरज पन्वर या धावपटूने भारताला ५ हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून दिली आहे. त्याने दोन टप्प्यात २०.३५.८७ आणि २०.२३.३० अशा वेळा नोंदवल्या.

इक्वेडोरचा ऑस्कर पॅटीन याने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या विजयामुळे भारताने या स्पर्धेत एकूण ११ पदके मिळवली आहेत. यात ३ सुवर्ण आणि ८ रौप्य पदके आहेत.

पॅरा आशियाई खेळांमध्ये भारत नवव्या स्थानी

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदकांसह भारताने आतापर्यंत एकूण 72 पदकं पटकावली आहेत. या कामगिरीसह पदक तालिकेत भारत नवव्या स्थानावर राहिला आहे.

चीनने 318 पदकांसह पहिला क्रमांक मिळवला असून दुसऱ्या स्थानावर दक्षिण कोरिया तर तिसऱ्या स्थानावर इराण आहे.

 

error: