Science :: Current Affairs

भारत आणि आशियामधील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र

बिहार राज्यातील पटना शहरात भारत आणि आशियामधील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र म्हणजेच ‘राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र’ (NDRC) उघडण्यात येणार आहे.

गंगा नदीतील लुप्तप्राय डॉल्फिन (Gangetic river species) यांची संख्या कमी होत आहे आणि ते आपले निवासस्थान बदलत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी हे केंद्र उभारण्यात येत आहे.

 

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव –

५ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथे चौथ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाचा विषय ‘ सायन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हा आहे.

जनसामान्यांनमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यासाठी, युवा वैज्ञानिकांना आपला ज्ञानसंग्रह वाढवण्यासाठी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्वाचे व्यासपीठ आहे.

पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन सन २००५ साली IIT दिल्ली येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे आयोजित केला जातो.

error: