Persons in News :: Current Affairs

स्पॅनिश ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

भारतीय कुस्तीला वेगळी ओळख निर्माण करुन देणाऱ्या विनेश फोगटने स्पॅनिश ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्पेनच्या माद्रिद शहरात झालेल्या स्पॅनिश ग्रँड पिक्स कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. विनेशने रशियाच्या वलेरिया चेप्साराकोव्हावर मात करुन उपांत्य फेरी गाठली व नंतर २४ वर्षीय विनेश फोगटने कॅनडाच्या नताशा फॉक्सचा अंतिम फेरीत १०-० च्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक स्वतःच्या नावावर केले.

‘द इंग्लिश पेशंट’ला गोल्डन बुकर पुरस्कार

श्रीलंकेत जन्मलेले कॅनेडियन कवी आणि कादंबरीकार मायकल ओंडाटेस यांच्या ‘द इंग्लिश पेशंट’ या साहित्यकृतीला मागील 5 दशकांमध्ये बुकर पुरस्कार जिंकणारी सर्वोत्तम कादंबरी घोषित करण्यात आले आहे. गोल्डन बुकरचा विजेता निवडण्यासाठी परीक्षकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. परीक्षकांनी  ‘इन ए फ्री स्टेट’, ‘मून टायगर’, ‘द इंग्लिश पेशंट’, ‘वुल्फ हॉल’ आणि ‘लिंकन इन द बार्डो‘ या पाच कादंबरीपैकी ‘द इंग्लिश पेशंट’ कादंबरीची गोल्डन बुकर विजेता म्हणून निवड केली.

 

error: