International :: Current Affairs

49 वा IFFI महोत्सव

20 ते 28 नोव्हेंबर 2018 या काळात 49 वा ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (IFFI) गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच  या कार्यक्रमाचे उद्घाटन पुढील चित्रपटाने केले जाणार आहे.

फीचर फिल्म – ‘ओलू’ (मल्याळम चित्रपट)

नॉन-फीचर फिल्म – ‘खरवस’ (मराठी चित्रपट)


भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) –

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना सन 1952 मध्ये करण्यात आली आहे.

पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९५२ साली मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सव पहिल्या वर्षी बिगर स्पर्धात्मक स्वरूपातील असून त्यामध्ये भारतासह २३ देश व UNO चा सहभाग होता.

सन २००३ पर्यंत या महात्सवाचे आयोजन भारतातील वेगवेगळ्या राज्यात व शहरात केले जात होते. परंतु २००४ पासून गोवा हे एकमेव राज्य यासाठी निश्चित करण्यात आले.

त्यामुळे आता प्रत्येक वर्षी नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यामध्ये हा महोत्सव गोव्यामध्ये १० दिवसांसाठी आयोजित केला जातो.  एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करते.

12वी एशिया यूरोप मिटिंग (ASEM)

16 ऑक्टोबर 2018 रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहरात 12वी ‘एशिया यूरोप मिटिंग’ (ASEM) शिखर परिषद भरविण्यात आली होती.


‘ग्लोबल पार्टनर्स फॉर ग्लोबल चॅलेंजेस’ या विषयाखाली ही परिषद आयोजित केली गेली होती.भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी या पारिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.


या पारिषदेमध्ये व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये आशिया व युरोपमधील संबंध बळकट करण्यासाठी चर्चा करण्यात आली.


‘एशिया यूरोप मिटिंग’ (ASEM) –

एशिया-युरोप मिटिंग (ASEM) हा एक संयुक्त आशियाई-युरोपीय मंच आहे. या परिषदेचे आयोजन युरोपीय संघाकडून केले जाते.

या मंचाची स्थापना 1996 साली करण्यात आली़ असून या ठिकाणी एकूण 53 सदस्य देशांचा सहभाग आहे.

युरोपीय संघ (EU) आणि युरोपीय कमिशनचे 15 सदस्य देश, दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN) याचे 7 सदस्य देश तसेच चीन, जपान व दक्षिण कोरिया हे स्वतंत्र देश यांच्या दरम्यान संबंध आणि सहकार्याच्या विविध प्रकारांना चालना देण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे.

error: