Economy :: Current Affairs

जगातील पहिले सार्वभौम ‘ब्ल्यू बॉण्ड’

29 ऑक्टोबर 2018 रोजी सेशेल्स प्रजासत्ताकाने जगातले पहिले सार्वभौम ‘ब्ल्यू बॉण्ड’ सादर केले आहे.

‘ब्ल्यू बॉण्ड’ म्हणजे शाश्वत समुद्री आणि मत्स्यपालन प्रकल्पांना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी तयार केले गेलेले एक प्रमुख आर्थिक साधन होय. यामार्फत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून $15 दशलक्ष इतकी रक्कम उभारण्यात येणार असून हे बॉण्ड विकसित करण्यात जागतिक बँकेनी मदत केली आहे.


सेशेल्स हा पूर्व आफ्रिकेमधील हिंद महासागरातल्या 115 बेटांचा एक द्वीपसमूह आहे. व्हिक्टोरिया हे देशाची राजधानी शहर आहे आणि सेशेलोईस रुपया हे अधिकृत चलन आहे.

या देशाला सुमारे 1.4 दशलक्ष चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळाचे ‘विशिष्ट आर्थिक क्षेत्र (EEZ)’ लाभलेले आहे.


 

कर उत्पन्नात महाराष्ट्र अव्वल

केंद्रीय प्रत्यक्ष करनिर्धारण मंडळाने (CBDT) नुकत्याच सादर केलेल्या आकडेवारीवरून, केंद्र सरकारच्या तिजोरीत प्राप्तिकराच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.


एकट्या महाराष्ट्राचे योगदान अन्य चार राज्यांच्या एकूण योगदानापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र आणि नवी दिल्ली मिळून देशाच्या एकूण प्राप्तिकराच्या निम्मा प्राप्तिकर देत असल्याचे आढळून आले आहे.


कर संकलनातील अव्वल पाच राज्ये –

आर्थिक वर्ष २०१७-१८  राज्य कराची टक्केवारी
महाराष्ट्र  ३८.३ %
नवी दिल्ली  १३.७ %
कर्नाटक  १०.१ %
तमिळनाडू  ६.७ %
गुजरात   ४.५%
error: