Defence :: Current Affairs

पृथ्वी -२ ची यशस्वी चाचणी

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी-2 या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची शनिवारी रात्री ओडिशातील चंडीपूर येथील तळावरून लष्कराकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली.

पृथ्वी-2 क्षेपणास्त्र

पृथ्वी-2 हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मारक पल्ला 350 किलोमीटर आहे.

पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.

या क्षेपणास्त्रामध्ये द्रवरूप इंधन असलेली दोन इंजिन्स असून त्यामध्ये इनर्शिअल गाईडन्स ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्यात आली आहे.

भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी हे पहिले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.

हे क्षेपणास्त्र स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये 2003 साली तैनात करण्यात आले आहे.

एस-४०० सिस्टिम

S- 400 system 

एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे.

शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे.

रशियाने विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे.

जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.

एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे.

युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.

४०० किलोमीटरच्या रेंजमधील सर्व प्रकारच्या टार्गेटसना भेदण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० फायटर तसेच टेहळणी विमाने, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलचा लक्ष्यभेद करु शकते.

ही सिस्टम एकाचवेळी १०० लक्ष्यांचा माग काढू शकते.

अमेरिकेचे रडारला न सापडणारे एफ-३५ हे अत्याधुनिक फायटर विमानही या सिस्टिमच्या नजरेतून सुटू शकत नाही.

२००७ सालापासून रशियाने एस-४०० चा वापर सुरु केला. मॉस्कोच्या सुरक्षेसाठी ही सिस्टिम तैनात आहे.

२०१५ साली रशियन नौदल आणि फायटर विमानांच्या सुरक्षेसाठी सीरियामध्ये ही सिस्टिम तैनात करण्यात आली.

error: