Death :: Current Affairs

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं निधन

ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे वयाच्या ९२ व्य वर्षी  सोमवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास निधन झालं आहे.  त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 साली झाला होता.

आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’,‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले.


‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली.

लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.


यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन

जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. अॅलन यांच्या ‘वल्कन’ या कंपनीने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले आहे.

पॉल अॅलन –

Image result for पॉल अॅलन

अॅलन यांनी आपले बालपणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. अॅलन आणि बिल गेट्स यांनी १९७५ मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.

क्रीडा प्रकारात अधिक रस असलेले अॅलन हे पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि सिएटल सिहॉक्सचे प्रमुख होते.

जून २०१७ मध्ये केलेल्या सर्वेनुसार, पॉल ॲलन हे जगातील ४६व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती सुमारे २०.७ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती. अॅलन यांनी बेघर लोक, अडव्हान्स सायंटिफिक रिसर्चसारख्या क्षेत्राला मागील दोन दशकांत २ अब्ज डॉलरची मदत केली आहे.

 

error: