Awards :: Current Affairs

राहुल द्रविड ICC च्या Hall of Fame मध्ये सामील

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना ICCच्या Hall of Fame या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला.

क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला.

ICC च्या Hall of Fame च्या यादीमध्ये समाविष्ट भारतीय खेळाडू –

१) भिशन सिंग बेदी

२) कपिल देव

३) सुनील गावस्कर

४) अनिल कुंबळे

५) राहुल द्रविड

Hall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं निधन

ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे वयाच्या ९२ व्य वर्षी  सोमवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास निधन झालं आहे.  त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 साली झाला होता.

आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’,‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले.


‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली.

लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.


यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

error: