BS-4 वाहनांची विक्री बंद

१ एप्रिल 2020 पासून भारतात भारत स्टेज-४ म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून १ एप्रिल २०२० नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे. परंतु जे ग्राहक आधीपासून BS-4 किंवा BS-3 च्या कार वापरतात त्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

BS-4 हे एक उत्सर्जन मानक आहे. भारत स्टेज इमिशन स्टँडर्डची (BSES) रचना भारत सरकारने केली आहे. या माध्यमातून गाडीतून निघणाऱ्या धुरामधून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण मोजले जाते. त्यानुसार त्या वाहनाचे वर्गीकरण विविध श्रेणींमध्ये केले जाते.

2000 साली BS मानकांची अंमलबजावणी सर्वप्रथम करण्यात आली. ऑक्टोबर 2010 मध्ये देशात BS-3 लागू करण्यात आला. यानंतर देशात 13 प्रमुख शहरांमध्ये एप्रिल 2010 पासून BS-4 लागू झाला. 2017 सालापासून संपूर्ण देशात BS-4 लागू करण्यात आला होता.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: