BCCI ची माहिती अधिकार कक्षा

केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार, देशाच्या क्रिडा क्षेत्रातली स्वायत्त संस्था असणारी भारतीय क्रिकेट नियमन मंडळ (BCCI) आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणले गेले आहे.

केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर अर्चयुलू यांनी हा निकाल दिला आहे.

BCCIचा कारभार माहिती अधिकार कायद्याच्या कलम 2(H) अंतर्गत येतो.

भारतीय क्रिकेट नियमन मंडळ (BCCI) –

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तथा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ही भारतातील क्रिकेटचे नियमन करणारी संस्था आहे.

भारतीय क्रिकेट नियमन मंडळ (BCCI) याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली.

याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: