BCCI आणि UNEP मध्ये “ग्रीन क्रिकेट” बाबत करार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि UNEP यांच्यामध्ये “ग्रीन क्रिकेट” ला प्रोत्साहन देण्याबाबत करार करण्यात आला आहे. या कराराचा उद्देश भारताला भेडसावत असलेल्या पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पर्यायी शाश्वत उपाययोजनांचा वापर करणे असा आहे.

या करारानुसार  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपल्या कार्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती करण्याचे उपक्रम राबवणार आहे. स्टेडियममधून प्लॅस्टिकचा वापर बंद केला जाणार आहे. तसेच आयपीएल सामन्यांदरम्यान विविध संघांच्या कर्णधारांची पर्यावरणविषयक संदेश असणारी ध्वनिचित्रफीतही दाखवली जाणार आहे.


UNEP या संघटनेची स्थापना १९७२ साली झाली. या संघटनेचे मुख्यालय केनियामधील नैरोबी येथे आहे.  ही संघटना जागतिक स्तरावर पर्यावरणविषयक जनजागृतीचे कार्य करते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: