Author Archive

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सहा करार

झिम्बाब्वेचे उपराष्ट्रपती केम्बो मोहाडी हे भारताच्या दौऱ्यावर आले असताना भारत आणि झिम्बाब्वे या देशांच्या दरम्यान द्वैपक्षीय सहकार्य बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये पुढील सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत –

* कला, संस्कृती आणि वारसा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

* पारंपरिक औषधोपचार आणि होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करार

* प्रसारण क्षेत्रात सहकार्यासाठी प्रसार भारती आणि झिम्बाब्वे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांच्यामध्ये एक सामंजस्य करार

* भूगर्भशास्त्र, खाणकाम आणि खनिजस्त्रोत या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

* राजकीय प्रतिनिधीचे पासपोर्ट असलेल्या धारकांना लागणार्‍या व्हिसा आवश्यकतेपासून दोन्ही बाजूने सूट देण्यासाठी करार

* माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (ICT) या क्षेत्रात सहकार्यासाठी दोन्ही देशांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांदरम्यान एक कृती योजना

जगातील पहिले सार्वभौम ‘ब्ल्यू बॉण्ड’

29 ऑक्टोबर 2018 रोजी सेशेल्स प्रजासत्ताकाने जगातले पहिले सार्वभौम ‘ब्ल्यू बॉण्ड’ सादर केले आहे.

‘ब्ल्यू बॉण्ड’ म्हणजे शाश्वत समुद्री आणि मत्स्यपालन प्रकल्पांना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी तयार केले गेलेले एक प्रमुख आर्थिक साधन होय. यामार्फत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून $15 दशलक्ष इतकी रक्कम उभारण्यात येणार असून हे बॉण्ड विकसित करण्यात जागतिक बँकेनी मदत केली आहे.


सेशेल्स हा पूर्व आफ्रिकेमधील हिंद महासागरातल्या 115 बेटांचा एक द्वीपसमूह आहे. व्हिक्टोरिया हे देशाची राजधानी शहर आहे आणि सेशेलोईस रुपया हे अधिकृत चलन आहे.

या देशाला सुमारे 1.4 दशलक्ष चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळाचे ‘विशिष्ट आर्थिक क्षेत्र (EEZ)’ लाभलेले आहे.


 

error: