92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे

ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारी या कालावधीत 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे.

साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा बहुमान लाभलेल्या डॉ. अरुणा ढेरे या पाचव्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत.


मराठी साहित्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या महिला अध्यक्ष –

१) कुसुमावती देशपांडे

२) दुर्गा भागवत

३) शांता शेळके

४) विजया राजाध्यक्ष

५) अरुणा ढेरे


पार्श्वभूमी –

ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने  न्या. रानडेयांनी  लोकहितवादींच्या  सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले.

त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते.

या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

काही महत्वाच्या बाबी –

यवतमाळमध्ये यापूर्वी १९७३मध्ये जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यावेळी ग. दि. माडगूळकर त्या संमलेनाचे अध्यक्ष होते.

९१ वे संमेलन बडोदा येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान झाले. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे त्यावेळी संमेलनाध्यक्ष होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: