6 विमानतळांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (AAI) चालवल्या जाणाऱ्या लखनऊ, इंदोर, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे येथील 6 विमानतळांना विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

हे पुरस्कार कॅनडाच्या हॅलिफॅक्स शहरात 12 सप्टेंबर रोजी ‘एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (ASQ) पुरस्कार 2017’ या समारंभात एयरपोर्ट काउंसिल इंटरनॅशनल (ASI) कडून दिले गेले आहेत.

नागरी विमान उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भारतामध्ये नागरी विमान उड्डयन संरचनेचे निर्माण, सुधारणा, देखरेख आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार आहे.

हे भारतीय वाहतूक आणि शेजारच्या महासागरालगत भागात हवाई वाहतूक व्यवस्थापन सेवा प्रदान करते.

याची स्थापना 1 एप्रिल 1995 रोजी झाली असून मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: