49 वा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

49व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन आणि समारोप सोहळा बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियम मध्ये होणार आहे.

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आतापर्यंत 64 देशांनी सहभाग नोंदवला आहे.

या वर्षीपासून क्रीडा विषयावरील चित्रपटांसाठी विशेष विभाग करण्यात आले आहेत तसेच या वर्षीपासून विशेष क्रीडा विभाग सुरु करण्यात आला असून खेळाशी संबंधित 6 ते 7 सिनेमे त्याअंतर्गत प्रदर्शित केले जाणार आहेत.

49व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भागीदार राज्य म्हणून झारखंड या राज्याची निवड करण्यात आली आहे.

हा महोत्सव माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित केला जातो.

जानेवारी-2019 या महिन्यात झारखंडच्या दोन शहरांमध्ये भारतीय पॅनोरामा अंतर्गत झारखंड चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला गेला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: