Monthly Current Affairs:: October 2018

कमी प्रदूषण फैलावणारे फटाके

विज्ञान व उद्योग संशोधन परिषद (CSIR) येथील शास्त्रज्ञांनी कमी प्रदूषण फैलावणारे फटाके विकसित केले आहेत. ते म्हणजे –

१) सेफ वॉटर रिलीझर (SWAS)

२) सेफ मिनीमल अॅल्युमिनियम (SAFAL)

३) सेफ थर्माईट क्रॅकर (STAR)


याशिवाय, CSIR-CEERI ने इलेक्ट्रॉनिक क्रॅकर (ई-क्रॅकर) विकसित केले आहे. हे फटाके प्रकाश/ध्वनी याचा प्रभाव उत्पन्न करण्यासाठी उच्च-व्होल्टेज इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्जच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे इलेक्ट्रिक स्पार्क उत्पन्न करतात.

पोस्ट कम्बशन कंट्रोल सिस्टम आणि डिव्हाइस – CSIR-NEERI ने स्थानिक धूळ नियंत्रणासाठी फोटोचिप सामग्री म्हणून PURE-WAYU ही नवीन यंत्रणा विकसित केली आहे.

रिड्युस्ड एमिशन क्रॅकर – CSIR-CECRI (कराईकुडी) ने कमी उत्सर्जन होणारे फटाके विकसित केले.

बिजली क्रॅकर – CSIR-NEERI ने प्रदूषके-विरहित फटाके विकसित केले.


नवे फटाके केवळ पर्यावरणाला अनुकूल आहेत. शिवाय परंपरागत फटाक्यांपेक्षा 15-20% स्वस्त आहेत. हे फटाके पाण्याचे बाष्प आणि/किंवा कमी धूर आणि कमी वायू उत्सर्जित करणारे आहेत.

फटाक्यांमध्ये वापरली जाणारी पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर ही प्रदूषके नव्या फटाक्यांमध्ये वापरली गेली नाहीत.

भारतातले सर्वात मोठे ड्राय डॉक

केरळमध्ये कोचीन शिपयार्ड येथे भारतातले सर्वात मोठे ड्राय डॉक उभारले जाणार आहे.

या बंदराच्या बांधकामासाठी 1799 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून हे बांधकाम सन 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

ड्राय डॉकमुळे सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत “मेक इन इंडिया” पुढाकाराला चालना मिळणार आणि हे जागतिक जहाजबांधणीच्या क्षेत्रात भारताचा वाटा वर्तमानातल्या 0.66% वरून 2% इतका करण्यास मदत करेल.

 

error: