Monthly Current Affairs:: June 2018

Re-Unite अॅप

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच ReUnite या मोबाईल अॅपचे अनावरण केले आहे. भारतातील हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

बेपत्ता झालेल्या मुलांचा मागोवा काढणारे हे पहिलेच अॅप आहे. आईवडिलांपासून काही कारणास्तव हरवलेल्या बालकांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहचवणे या अॅपद्वारे शक्य होणार आहे. या अॅप्लीकेशनमार्फत पालक आपल्या मुलांचे फोटो अपलोड करू शकतात, मुलाचे तपशील जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख इ. पोलिस स्टेशनला कळवू शकतात आणि हरवलेल्या मुलांची ओळख पटवू शकतात. हे  अॅप दोन्ही Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी संस्थापक असलेली स्वयंसेवी संस्था ‘बचपन बचाओ आंदोलन’ आणि कॅपजेमिनी या सॉफ्टवेअर कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.

मुलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘बचपन बचाओ आंदोलन’ या देशातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेने बालहक्क संरक्षणासाठी कायदे बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

2006 च्या निठारी प्रकरणामुळे बचपन बचाओ आंदोलन सुरू झाले होते.

 

तापमानवाढीचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वर विपरीत परिणाम

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे तापमानवाढ आणि मान्सूनवर परिणाम होऊन देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) मध्ये 2050 पर्यंत 2.8 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जागतिक बँकेच्या ‘दक्षिण आशिया हॉटस्पॉट : तापमान आणि पर्जन्यमानातील बदलाचा जीवसृष्टीवरील परिणाम’ या नावाने प्रकाशित झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

अहवालानुसार भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांना हवामानातील बदलामुळे येणाऱ्या विपरीत संकटांना सर्वाधिक सामोरे जावे लागणार आहे. 2050 पर्यंत देशाच्या आतील भागातील तापमानात वाढ होणार असून किनारी प्रदेशातील तापमानात घट होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

भारतातील सर्वाधिक तापमानवाढ वर्तवलेले राज्ये –

१. मध्यप्रदेश

२. छत्तीसगड

३. राजस्थान

४. उत्तरप्रदेश

५. महाराष्ट्र

देशातील अतिउष्ण जिल्ह्ये –

विदर्भातील (७) – चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, राज नांदगाव आणि दुर्ग

3 जिल्हे छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मधील आहेत.

स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

error: