Monthly Current Affairs:: May 2018

‘एक सफर रेल के साथ’

रेल्वे रुळ न ओलांडणे आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी मध्य रेल्वेने कलाकारांचं सहाय्य घेतले आहे. ‘एक सफर रेल के साथ’ या सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देणाऱ्या मोहिमेचे दूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.

रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने रुळ न ओलांडण्याचा भाग महत्त्वाचा ठरतो. तसेच, रेल्वे परिसरातील स्वच्छतेचाही भाग लक्षात घेउन मध्य रेल्वेने जनजागृतीसाठी ‘एक सफर रेल के साथ’ मोहीम राबवली आहे.

 

जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट

मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट केली आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजनं वर्तवला आहे.

खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे. 2019 मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे.

error: