2018 चा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

सांगली येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारा विष्णुदास भावे पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Image result for डॉ. मोहन आगाशे

डॉ. मोहन आगाशे यांची कारकीर्द –

डॉ. मोहन आगाशे यांची कारकीर्द मोठी असून एमबीबीएसच्या शिक्षणानंतर त्यांनी मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. लहानपणापासूनच त्यांनी सई परांजपे यांच्या बालनाट्यात काम करायला सुरुवात केली.

त्यांची गाजलेली नाटके –

धन्य मी कृतार्थ मी

तीन पैशाचा तमाशा

बेगम बर्वे

तीन चोक तेरा

वासांशी जीर्णानी

सावर रे

काटकोन त्रिकोण.


नाटकांबरोबरच जैत रे जैत, सिंहासन, एक होता विदूषक, देवराई, वळू, विहीर या मराठी चित्रपटांबरोबरच निशांत, आक्रोश, मशाल, मृत्युदंड, गंगाजल, अपहरण, रंग दे बसंती या हिंदी चित्रपटातही त्यांच्या भूमिकांना रसिकांसह समीक्षकांची पसंती मिळाली.


2013 मध्ये बारामती येथे झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी एक हजार भूकंपग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.

मिळालेले पुरस्कार –

डॉ. मोहन आगाशे यांना 2002 मध्ये आर्डर अॉफ मेरीट अॉफ द फेडरल रिपब्लीक अॉफ जर्मनी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मार्च 2004 मध्ये गोएथे पदकाने सन्मानित करण्यात आले.

1990 च्या जानेवारी महिन्यात त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले.

1996 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार

1998 मध्ये  ‘पुणे प्राईड’ असे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत

विष्णुदास भावे पुरस्कार –

विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ‘ रंगभूमिदिना’ दिवशी हे मानाचे पदक दिले जाते.

या पुरस्काराचे स्वरूप – मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते.

आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री. काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, शरद तळवलकर, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, दिलीप प्रभावळकर(२००७), रामदास कामत (२००८), शं.ना. नवरे (२००९), फैय्याज इमाम शेख (२०१०), रत्‍नाकर मतकरी (२०११), अमोल पालेकर (२०१२), महेश एलकुंचवार (२०१३), डॉ.जब्बार पटेल (२०१४), विक्रम गोखले (२०१५), जयंत सावरकर (२०१६) आदींना मिळाला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: