2015-16 साठी कृषी जनगणनेची आकडेवारी जाहीर

भारत सरकारने सन 2015-16 साठीची कृषी जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. कृषी क्षेत्रात गुंतलेल्या कामगारांबाबत असे आढळून आले आहे की, कृषी क्षेत्रात महिला शेतकऱ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

अन्य बाबी –

देशातील लहान आणि मध्यम स्वरुपाची मालकी भूखंड असलेल्या आणि भाड्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

उत्तरप्रदेशात भाड्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि या बाबतीत उत्तरप्रदेशानंतर बिहार आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो.

सन 2015-16 मध्ये उत्तरप्रदेशामध्ये 23.82 दशलक्ष शेतकरी आणि भाडेपट्टीवर शेती करणारे होते. त्यानंतर बिहार (16.41 दशलक्ष) आणि महाराष्ट्र (14.71 दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो.

भारतात लागवडीखाली असलेल्या भूखंडापैकी 86.21% लहान व मध्यम शेतकऱ्यांच्या मालकीचे आहे. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी भूखंड आहे, तर 10 हेक्टरचे मालकी भूखंड असलेल्यांची संख्या केवळ 0.57% आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: