18 दशलक्षाहून अधिक नवीन कर्करोग होण्याचा अंदाज

संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (UN-IARC) याच्या मते, 2018 साली 18 दशलक्षाहून अधिक नवीन कर्करोग होण्याचा अंदाज आहे तसेच असा अंदाज आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांमुळे 95 लक्ष लोकांचा मृत्यू होईल.

जागतिक पातळीवर कर्करोगाचा धोका वाढत आहे. जगभरात पाचपैकी एक पुरुष आणि सहापैकी एका महिलेला कर्करोग होतो. आठ पुरुषांमध्ये एक व 11 महिलांमध्ये एकाचा मृत्यू कर्करोगाने होत आहे.

भारतात सर्व वयोगटात स्त्री-पुरूषांमध्ये एकूण 1,157,294 कर्करोगाची प्रकरणे आढळून आली आहेत. त्यात 587,249 महिलांना कर्करोग असल्याचे निदान झाले आहे.

फुफ्फुसाचा कर्करोग हे एक प्रमुख कारण बनले आहे आणि 28 देशांतील स्त्रियांमध्ये कर्करोग मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे.

याबाबतीत हंगेरीसह उत्तर अमेरिका, उत्तर आणि पश्चिम युरोप (विशेषतः डेन्मार्क आणि नेदरलँड्स), चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे यादीत शीर्षस्थानी आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था -

संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (UN-IARC) हा जागतिक आरोग्य संघटनेचा एक विशेष विभाग आहे.

याचे मुख्यालय ल्योन (फ्रान्स) शहरात आहे.

याची स्थापना 20 मे 1965 रोजी करण्यात आली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: