६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला

AKIF (Amature Kabaddi Federation of India) ने आगामी स्पर्धेच वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

या वेळापत्रकात ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला देण्यात आलेला असून, फेडरेशन चषक हा हिमाचल प्रदेशमध्ये भरवला जाणार आहे.

याचसोबत प्रो-कबड्डी लीग, कबड्डी विश्वचषक, बीच कबड्डी अजिंक्यपद यांसारख्या अनेक महत्वाच्या स्पर्धांची वेळापत्रक आज कबड्डी फेडरेशनने जाहीर केली आहेत.

वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

६६ वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष)

आयोजन – महाराष्ट्र कबड्डी फेडरेशन
——————————————————

६६ वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा (महिला)
आयोजन – आंध्र कबड्डी असोसिएशन
ठिकाण – कुरनूल
तारीख – १९ नोव्हेंबर २०१८ ते २३ नोव्हेंबर २०१८

——————————————————

४ था सिनीअर फेडरेशन चषक
आयोजन – हिमाचल प्रदेश कबड्डी असोसिएशन
ठिकाण – शिमला
——————————————————-

११ वी बीच कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा (महिला-पुरुष)
आयोजन – उत्तराखंड कबड्डी असोसिएशन
ठिकाण – हरिद्वार
——————————————————

प्रो-कबड्डी सहावा हंगाम
आयोजन – मार्शल स्पोर्ट्स
ठिकाणी – १२ शहरांमध्ये खेळवले जाणार सामने
तारीख – १९ ऑक्टोबर २०१८ ते २० जानेवारी २०१९

——————————————————

कबड्डी विश्वचषक २०१९
आयोजन – आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन
ठिकाण – अद्याप निश्चीत नाही
तारीख – फेब्रुवारी – मार्च २०१९

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: