६व्या आरसीईपी मंत्रीस्तरीय बैठकीची सुरुवात

सहाव्या प्रादेशिक सर्वसमावेशक वित्तीय परिषदेची (RCEP – Regional Comprehensive Economic Partnership) आजपासून सिंगापूर येथे सुरु झाली आहे.

सिंगापूर येथे सुरु झालेल्या मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू उपस्थित झाले आहेत.

या दोन दिवसीय बैठकीत 10 आसियान देश आणि आसियान एफपीएचे सहा सदस्य देश सहभागी झाले असून सदस्य राष्ट्रांमध्ये दर्जेदार, समतोल आणि सर्वसमावेशक चर्चा होणे अपेक्षित आहे.

सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेत आसियान देश महत्वाची बाजारपेठ असून भारतासाठी या देशांतून व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. गेल्या वर्षी आसियान देश आणि भारतात 81.33 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला असून हा समूह भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार ठरला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: