‘हॉल ऑफ फेम’मध्ये पाचवा भारतीय खेळाडू

क्रिकेट विश्वात ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

क्रिकेट जगतातील या प्रतिष्ठांच्या यादीमध्ये सामील होणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. यादीमध्ये समाविष्ट झालेले भारतीय क्रिकेटपटू –

बिशन सिंह बेदी (२००९)

सुनिल गावस्कर (२००९)

कपिल देव (२००९)

अनिल कुंबळे (२०१५)

राहुल द्रविड (२०१८)

‘हॉल ऑफ फेम’ –

‘हॉल ऑफ फेम’ म्हणजे एक अशी यादी असते कि ज्यामध्ये क्रिकेट क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश करून त्यांच्या कामगिरीबाबत गौरविण्यात येते. ‘हॉल ऑफ फेम’ ची सुरुवात २००९ साली झाली आहे. हॉल ऑफ फेममधील एकूण खेळाडूंची संख्या आता 87 झाली आहे. यात 7 महिला आणि 80 पुरुष क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

इंग्लंड (28), ऑस्ट्रेलिया (25), वेस्ट इंडिज (18), पाकिस्तान (5), भारत (5), न्यूझीलंड (3), दक्षिण आफ्रिका (2) आणि श्रीलंका(१) यांचा समावेश आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: