हिमालयातील चार विशेष शिखरे

हिमालयाच्या प्रदेशात गंगोत्री या हिमनदीच्या जवळ असलेल्या चार पर्वत शिखरांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

ही नावे पुढीलप्रमाणे आहेत –

१) अटल – १ (उंची – ६,५५७ मीटर)

२)अटल – २ (उंची – ६,५६६ मीटर)

३)अटल – ३ (उंची – ६,१६० मीटर)

४)अटल – ४ (उंची – ६,१०० मीटर)

हिमालय पर्वताच्या रांगा

हिमालय, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या घळ्यांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिरवर्क आकार प्राप्त झाला आहे.

१) ट्रान्स हिमालय :

ब्रहद् हिमालयाच्या उत्तरेस ट्रान्स हिमालयाच्या रांगा आहेत. ट्रान्स हिमालयाचा विस्तार पश्चिम – पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी १००० किमी इतकी आहे. ट्रान्स हिमालयात खालील रांगांचा समावेश होतो.

अ) काराकोरम रांगा –

भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते. काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गीलगिट नदीच्या पूर्वेला ८०० किमी. पर्यंत आहे. जगातील सर्वात उंचीचे २ नंबरचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के – २ ( गॉडविन ऑस्टीन) याच रांगेमध्ये आहे.

ब) लडाख रांगा –

सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्यादरम्यान लडाख रांग आहे. लडाख रांगेची लांबी ३०० किमी आणि सरासरी उंची ५८०० मी. आहे.

क) कैलास रांगा –

लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.

२) बृहद् हिमालय (Greater Himalaya) :

लेसर हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीसारखे पसरलेले बृहद् हिमालयाची रांग आहे. बृहद् हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे (MCT-Maincentral Thrus) लेसर हिमालयापासून वेगळा झाला आहे.

बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. यातील बरीचशी शिखरे ही ८००० मी. पेक्षा जास्त आहे. या रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर मांऊट एव्हरेस्ट आहे.

या रांगेतील शिखरे उतरत्या क्रमाने – १) एव्हरेस्ट, २) कांचनगंगा, ३) मकालू, ४) धवलगिरी, ५) अन्नपूर्णा, ६) नंदा देवी, ७) कामेत, ८) नामच्या बरवा, ९) गुरला मंधता, १०) बद्रीनाथ

३) लेसर हिमालय/मध्य हिमालय ((Lesser or Middle Himalaya) :

मध्य हिमालयालाच हिमाचल, हिमालया असे देखील संबोधले जाते. दक्षिणेकडील शिवालीक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लेसर हिमालय पसरलेला आहे.

लेसर हिमालयाची रचना ही गुंतागुंतीची असून, या पर्वताची सरासरी उंची ३५०० ते ५००० मी. यांदरम्यान आहे. लेसर हिमालयात मुख्याने पीरपंजाल, धौलाधर, मसुरी व नागतिब्बा या रांगांचा समावेश होतो.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: