‘स्वस्थ भारत यात्रा’

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएफएएसआय), नवी दिल्ली यांनी सुरु केलेली ‘ईट राइट इंडिया’चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘स्वस्थ भारत यात्रा’चे  संपूर्ण देशभरात १६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये स्वस्थ भारत यात्रा १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहे.

या यात्रेचा मुख्य उद्देश ‘ईट राइट इंडिया’ हा असून स्वस्थ भारत यात्रा  पुढील तीन मुद्यांवर आधारित आहे.

१) ‘ईट हेल्दी – आरोग्यदायी खा’

या संकल्पनेमध्ये आहारातील साखर, मीठ व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी करणे, आरोग्यदायी अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध करणे विशेष करुन अखंड कडधान्य, तृणधान्याचा वापर वाढवण्याबाबतचा कार्यक्रमाचा समावेश होतो.


२) ‘ईट सेफ -सुरक्षित खा’

या संकल्पनेमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेवर भर देणे, खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे, भेसळ रोखण्यासाठी सोप्या अन्न भेसळ ओळखणाऱ्या पद्धतींबाबत जनजागृती करणे आदींचा समावेश होतो.


३) ‘ईट फोर्टीफाईड – पौष्टिक खा’ 

या संकल्पनेत ॲनिमियामुक्त भारत हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

यामध्ये फोर्टिफाईड मीठाचा वापर वाढवणे, त्यास मुक्त बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच विविध शासकीय योजना व कार्यक्रमामध्ये फोर्टिफाईड अन्नपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: