स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार-2018

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये अव्वल ठरलेल्या राज्य आणि जिल्ह्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये हरियाणाला सर्वोत्तम राज्याचा तर महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्याला सर्वोत्तम जिल्ह्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरिकांच्या सर्वाधिक सहभागासाठी उत्तर प्रदेशला सन्मानित करण्यात आले.

स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करुन घेण्यात आले  होते.  शाळा, अंगणवाड्या, बाजारपेठा अशा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, नागरिकांचा सहभाग, त्यांच्या शिफारशी अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित देशभरातल्या 685 जिल्ह्यांमधल्या 6,786 गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

अव्वल तीन राज्ये –

1) हरियाणा

2) गुजरात

3) महाराष्ट्र


अव्वल तीन जिल्हे-

1) सातारा- महाराष्ट्र

2) रेवडी-हरियाणा

3) पेडापल्ली-तेलंगण


सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाची राज्ये-

1) उत्तर प्रदेश

2) गुजरात

3) महाराष्ट्र


सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाचे जिल्हे-

१) नाशिक आणि सोलापूर- महाराष्ट्र

२) चित्तोडगढ- राजस्थान


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: