स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत महाराष्ट्रातील सातारा जिल्हा परिषद देशात अव्वल

स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत महाराष्ट्रातील सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये संख्यात्मक व गुणात्मक असे 100 गुणांचे केंद्रीय स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाने सर्वेक्षण केले होते.त्यात सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे.

गुणांकाचे स्वरूप – 

१. सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेच्या निरीक्षणास 30 गुण

२.नागरिक, मुख्य प्रभावी व्यक्तींची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्रायास 35 गुण

३. स्वच्छताविषयक सद्यःस्थितीला 35

यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेने शौचालय बांधून हागणदारीमुक्त जिल्हा करण्यात देशात तृतीय क्रमांक मिळवला होता.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: