‘स्ट्रेन्दनिंग फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट इन इंडिया’ रिपोर्ट

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘स्ट्रेन्दनिंग फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट इन इंडिया’ शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात लोकसहभागाने वणवा संदर्भात व्यवस्थापनाविषयी व वनातील वणवा रोखून वनसंपत्तीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने काही शिफारसी सुचविलेल्या आहेत.

सुचविलेल्या शिफारसी –

१) स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता ‘राष्ट्रीय वणवा रोधक व्यवस्थापन योजना’ तयार करणे.

२) ही योजना वेळबद्ध प्रक्रियेतून सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकसहभागातून अंमलात आणणे.

३) यात वणवा रोखण्यासाठी सुसज्ज आणि प्रशिक्षित कार्यदल तयार करणे आणि वणव्याशी लढण्यासाठी विविध पद्धती सरावात आणणे.

४) मंत्रालय, राज्य वन विभाग, समुदाय आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या ठरवणे.

५) ज्ञानामधील अंतर भरून काढण्यासाठी सुधारीत माहितीच्या मदतीने आणि संशोधन करून वणवा-रोधी व्यवस्थापनात मदत देणे.

६) व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय संशोधनासाठी विषय परिभाषित करणे आणि या क्षेत्रात वैज्ञानिक संशोधनासाठी निधी संकलनाच्या संधी प्रदान करणे.

वणव्यामुळे उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साइड (CO2) हे वैश्विक उष्णतेसाठी कारणीभूत ठरते. देशात लागणाऱ्या वणव्याच्या 47% भाग 20 जिल्ह्यांमध्ये असमान रीतीने दिसून येतो.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: