‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1‘

अमेरिकेने भारताचा समावेश ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1‘ (एसटीए) यादीत केला आहे.

अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताचे स्थान पाहता करण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण बदल असून, भारतासोबतचे आर्थिक व संरक्षण संबंध आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळेच भारताला हा दर्जा देण्यात आल्याचे विल्बर रॉस स्पष्ट केले.

अमेरिकेने 2016 मध्ये भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती.

जगभरातील 35 देशांना अमेरिकेचा ‘एसटीए-1‘ दर्जा प्राप्त असून, आता भारताचाही समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे.

हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश असून, आशियातील जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही या यादीत समावेश आहे. नाटोचे सदस्य असलेल्या बहुतांशी देशांनाही यात स्थान देण्यात आले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: