‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी बांधण्यात आलेल्या १८२ मीटर उंच असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या १४३ व्या जयंतीदिवशीच ३१ ऑक्टोबरला पार पडले.

नुकताच टागोर पुरस्कार २०१८ प्राप्त झालेले प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हे शिल्प साकारले असून सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे.

काही महत्वाच्या गोष्टी –

जगभरात एकूण १३९ पुतळ्यांची उंची ३० मीटर किंवा त्याहून अधिक आहे. यापैकी सुमारे ४२ टक्के पुतळे हे चीन आणि भारतामध्ये आहेत.

३० मीटरपेक्षा जास्त उंचीचे सर्वाधिक पुतळे चीनमध्ये आहेत. ३० मीटरहून अधिक उंच पुतळे असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये २५ पुतळ्यांसहीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.

विशेष म्हणजे या यादीमधील अव्वल पाच देशांपैकी चार देश हे अशिया खंडातील आहेत. यामध्ये चीन व भारतापाठोपाठ २० पुतळ्यांसहीत जपान तिसऱ्या स्थानी तर १० पुतळ्यांसहीत तैवान चौथ्या स्थानी आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशामध्ये ३० मीटरहून अधिक उंची असणारे केवळ ५ पुतळे आहेत.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: